केनिया : पोलिसांच्या छाप्यात १७० पोती साखर जप्त

295

नैरोबी : युगांडातून केनियाला साखर तस्करी वाढल्याने केनिया पोलीस सावध झाले आहेत. ट्रान्स नजोईया काउंटीचे पोलीस कमांडर (सीपीसी) जैकिंटा वेसोंगा यांनी सांगितले की, ट्रान्स नजोईयात पोलीसांनी १७० पोती निर्बंध असलेल्या साखर जप्त केली आहे. वेसोंगा यांनी सांगितले की, आम्ही केनिया आणि युगांडा या दरम्यानच्या सीमेसह पश्चिम पोकोट काऊंटमधील कान्यार्कवाटमध्ये युगांडाची ब्रँडेड साखरेची पाकिटे घेऊन जाणारा ट्रक दिसून आला होता.

वेंसोंगा यांनी सांगितले की, आमच्या गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ट्रकचा पाठलाग केला. तेव्हा क्वाजा सब काऊंटीमध्ये किमरानी गावातील वंबुगु याच्या घरी हा ट्रक गेला. सुरक्षा पथकाने दोन वाजता घरावर छापा टाकला. तेव्हा संशयित साखर युगांडाच्या पोत्यातून केनियाच्या ब्रँडेड मोठ्या बॅगेत भरताना दिसून आले.

चार संशयित युगांडाची किनयारा, लुगाजी, मयूज या कंपन्यांची साखर अनुक्रमे काबरा, बुसिया आणि बुटाली या कंपन्यांच्या पॅकिंगमध्ये भरताना आढळले. चारही संशयितांना क्वांजा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फ्रान्सिस गिचुही कामाऊ, डेव्हिड सिफुना कुबासी, सोप्रोसा वरुगुरू वंबुगू (वंबुगूची पत्नी) आणि जिप्पोरा वरुगुरू मुरोती (वंबुगूची मुलगी) अशी संशयितांची नावे आहेत. १७० पोती साखरेसह टेम्पो, कबरा, बुसिया, बुटाली साखर कारखान्याची अनेक पोती, इलेक्ट्रिक शिलाई मशीन क्वांजा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here