नैरोबी : सियाया (Siaya) काउंटीमधील Seal साखर कारखाना प्रशासनाने आणखी एक साखर कारखाना उभारणीसाठी पर्यावरण विभागाकडून मंजुरी घेतली आहे. एलेगो उसोंगा उप काऊंटीमध्ये कारखाना स्थापन करण्यासाठी राष्ट्रीय पर्यावरण व्यवस्थापन प्राधिकरणाने (नेमा) हिरवा कंदील दाखवल्याचे सील साखर कारखान्याचे म्हणणे आहे. यापूर्वी मॅट्रेस लिमिटेडच्या मालकांनी २०१७ मध्ये सियासा काऊंटीमध्या Sh940 मिलियनच्या गुंतवणुकीसह साखर कारखाना उभारणीची घोषणा केली होती. मात्र, आतापर्यंत साऊथ जेम शुगर मिल सुरू झालेली नाही.
सील साखर कारखाना प्रशासनाने सांगितले की, साधारणतः १८४०० एकर जमिनीवर उभारल्या जाणाऱ्या या नव्या कारखान्यात १२०० जणांना नोकरी मिळू शकेल. नव्या साखर कारखान्याची प्रारंभिक ऊस गाळप क्षमता प्रतीदिन १२५० टीसीडी असेल. येथून तीन मेगावॅट अक्षय ऊर्जेची निर्मिती होईल. सील साखर कारखाना ३ मेगावॅट विजेचे उत्पादन करण्यासाठी ताज्या बगॅसचा वापर करेल. साखर कारखान्यामुळे शेतकरी आणि परिसरातील नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होईल. साखर कारखाना प्रशासनाने सांगितले की, ऊस वाहतूक करण्यासाठी लागणाऱ्या दीर्घ कालावधीसह पिकांचे नुकसानही कमी होईल. केनियामध्ये ८,००,००० टन वार्षिक खपाच्या तुलनेत वार्षिक ६,००,००० टन साखरेचे उत्पादन केले जाते.