केनिया: मे महिन्यात साखरेच्या आयातीमध्ये ९ टक्क्यांनी वाढ

367

नैरोबी : केनियातील देशांतर्गत उत्पादनात झालेल्या घसरणीनंतर मे महिन्यातील साखरेच्या आयातीमध्ये नऊ टक्क्यांची वाढ झाली आहे. सरकारने आयातीचे पाऊल उलचलल्याने ग्राहकांना साखरेच्या दरवाढीपासून दिलासा मिळणार आहे. साखर संचालनालयाच्या आकडेवारीनुसार या कालावधीत २४,७३५ टन साखर आयात करण्यात आली. गेल्यावर्षी याच कालावधीत २३,१३८ टन साखरेची आयात करण्यात आली होती.

वाढलेल्या आयातीनंतर साखरेचे दर एसएच ११७ या सरासरी दरावरुन घटून एसएच १०९ प्रती किलो झाले आहेत. संचालनालयाने आपल्या मासिक अहवालात म्हटले आहे की, मे २०२१ मध्ये साखरेची आयात २४,७३५ टन करण्यात आली. आयात केलेल्या साखरेच्या खर्चात पाच टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे एक टन साखरेचा दर एस एच ५४-८३२ वरुन वाढून एसएच ५७-४७३ झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here