केनिया: ऊस आयात प्रतिबंध हटवण्याची साखर कारखान्यांची मागणी

नैरोबी : केनिया शुगर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (केईएमएसए) ने कृषी कॅबिनेट सचिव पीटर मुन्या आणि काकामेगा गव्हर्नर विक्लिफ ओपरान्या यांना पत्र लिहून ऊस आयातीवरुन प्रतिबंध हटवण्याची मागणी केली. केईएसएमए यांच्या म्हणण्यानुसार, कारखानदारांपैकी एक बसिया साखर उद्योग सध्या ऊसाच्या कमी पुरवठयामुळे प्रभावित झाला आहे. केस्मा च्या अध्यक्ष जयंती पटेल यांनी 3 ऑगस्ट 2020 च्या पत्रात सांगितले की, गाळप पूर्ण क्षमतेने होण्यासाठी ऊसाच्या पुरेशा पुरवठ्याची गरज आहे, ज्यासाठी सरकारला ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.

केस्मा च्या मतानुसार, बुसिया क्षेत्रामध्ये ऊसाच्या कमी शेतीमुळे कमी ऊस पुरवठ्याची स्थिती आहे. बुसिया साखर उद्योग यापूर्वीपासूनच देशामद्ये ऊसाची शेती वाढवण्यावर काम करत आहे. यावेळी त्यांना कारखाना पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी ऊसाची गरज आहे. केंस्मा ने सांगितले की, युगांडातून ऊसाच्या पुरवठ्यावरील प्रतिबंध हटवण्यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. कारण सध्या पीकाचा स्थानिक पुरवठा अपर्याप्त आहे. पटेल म्हणाले की, स्थनिक साखर उद्योगाकडून साखर उत्पादनाला गती देण्यासाठी आवश्यक कारवाई करावी. वेस्टर्न डेवलपमेंट इनिशिएटीव असोसिएशन चे अध्यक्ष जोसेफ बारासा यांनी सांगितले की, कमी उड पुरवठ्यामुळे कारखाने गाळपासाठी संघर्ष करत आहेत. बरसा म्हणाले की, शेतकरयांना अधिक उड लागवडीसाठी प्रोत्साहित केले केले आहे कारण कच्च्या मालाची कमी असेल तरच बाहेरुन ऊस आणण्याची परवानगी दिली जावू शकते. वेस्टर्न डेवलपमेंट असोसिएशन एक असा समूह आहे की, जो शेतकर्‍यांच्या अधिकारांसाठी संघर्ष करतो.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here