केनिया : साखरेच्या दरात वाढ होण्याची शक्यता

नैरोबी : केनियामध्ये सरकारने ऊसाचे दर वाढविल्यानंतर पुढील काही दिवसात साखरेच्या दरात वाढीची शक्यता आहे. कृषी विभागाचे कॅबिनेट सचिव पीटर मुन्या यांनी उसाचा दर ३,८३३ रुपये प्रती टनावरुन वाढवून ४,११२ रुपये करण्यात आला आहे. दुसऱ्यांदा सरकारने उसाच्या दराचा आढावा घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यंना मोठा दिलासा मिळाला आहे.
आता साखर कारखान्यांच्या मालकांकडून या वाढलेल्या दराचा भार ग्राहकांवर टाकला जाण्याची शक्यता आहे.

सुपरमार्केटमध्ये न्यूट्रल मिलसारख्या साखरेच्या दोन किलोच्या पाकिटाची विक्री Sh295ला करण्यात येत आहे. त्यामुळे एका आठवड्यात किमतीत १८ टक्क्यांची वाढ झाली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मशीन खराब झाल्याने आणि नियमीत देखभाल बंद झाल्याने अनेक कारखाने उत्पादनात अडथळे येण्यास सुरुवात झाली आहे. उत्पादनात घट झाल्याने बाजारातील पुवरठ्यातही कपात झाली आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात साखरेचा दर ४,८०० रुपये झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here