केनिया: एप्रिल महिन्यात साखर उत्पादनात घट, दर वाढले

नैरोबी : केनियामध्ये एप्रिल महिन्यात साखर उत्पादनात जवळपास ३६ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे. त्यामुळे कमोडिटीच्या किरकोळ किमतीत वाढ झाली आहे. साखर संचालनालयाकडील मासिक आकडेवारीनुसार दिसून येते की, एप्रिल २०२३ मध्ये एकूण साखर उत्पादन मार्चमध्ये नोंदविण्यात आलेल्या ४९,७६१ मेट्रिक टनावरुन घसरून ३१,९७० मेट्रिक टन (MT) झाले. कमी ऊस पुरवठ्यामुळे साखर उत्पादनात घसरण झाल्याचे दिसून आली आहे. सर्व साखर कारखान्यांकडून एप्रिल २०२३ मध्ये ऊस गाळप घसरून ४,०५,३८९ मेट्रिक टन झाले. मार्च महिन्यात हे गाळप ५,४६,१५० मेट्रिक टन तर फेब्रुवारी २०२३ मध्ये गाळप ७,१६,२७४ मेट्रिक टन झाले होते. त्यामुळे मार्च महिन्यात साखर उत्पादन ४९,३७१ मेट्रिक टनावरुन घसरुन ३२,७२३ मेट्रिक टनावर आले.

साखर संचालनालयाच्या म्हणण्यानुसार, या आढावा कालावधीत कमी आयातीसह कमी स्थानिक उत्पादनामुळे ग्राहकांना साखरेसाठी जादा पैसे मोजावे लागले. त्यामुळे साखरेच्या किमती प्रती किलो १.९ pc वाढल्या. मात्र, मार्च महिन्यातील विक्री ५०,७५२ मेट्रिक टनावरुन घसरून ३६,१८२ मेट्रिक टन झाली. एप्रिल २०२३ मधील साखरेचा घाऊक दर सरासरी Ksh ७,२१० प्रती ५० किलो पोते होता. हा दर गेल्या महिन्यातील Ksh ७,१७१ प्रती ५० किलो पोत्यापेक्षा १ pc जास्त होता. साखर संचालनालयाने म्हटले आहे की, एप्रिल २०२३ मधील किरकोळ साखरेचा दर मार्चमधील १५७ Ksh प्रती किलो आणि फेब्रुवारी महिन्यातील १४७ Ksh प्रती किलोच्या तुलनेत सरासरी Ksh १६० प्रती किलो झाला. यावर्षी एप्रिल अखेरपर्यंत सर्व कारखान्यांकडे क्लोजिंग स्टॉक मार्च महिन्यातील १०,८४४ मेट्रिक टनावरुन घटून ८०२३ मेट्रिक टन राहिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here