केनिया : ऑगस्ट महिन्यात साखर उत्पादन ३४ टक्क्यांनी घटले

नैरोबी: केनियामध्ये पक्व उसाच्या कमतरतेमुळे ऑगस्टमध्ये साखरेचे उत्पादन ३४ टक्क्यांनी घसरले. अनेक कारखाने देखभालीच्या कामासाठी बंद झाल्या. त्यामुळे ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागला. साखर संचालनालयाकडील उपलब्ध आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, ऑगस्टमध्ये एकूण साखरेचे उत्पादन ४६,४५९ टन झाले आहे. एक महिन्यापूर्वी हे उत्पादन ७०,२७८ टन होते. साखर संचालनालयाने सांगितले की, क्वाले, सोईन आणि ओलेपिटो मिल या देखभालीसाठी बंद ठेवण्यात आल्या होत्या. तर मे महिन्यात बंद झालेल्या नाझोया आणि कॅमेलिल मिल्स ऑगस्टमध्ये पुन्हा सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, साखरेचे दर ऑगस्ट महिन्यापासून सातत्याने वाढत आहेत. साखर संचालनालयाचे प्रमुख विलिस ऑडी यांनी सांगितले की, अनेक कारखान्यांना उसाचा तुटवडा जाणवत आहे. केनियाला कॉमन मार्केट फॉर ईस्ट अँड साउथ आफ्रिका (KOMESA) मधून ३५०,००० टन साखर आयात करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here