केनिया : निझोया साखर कारखाना जानेवारीमध्ये देखभालीसाठी बंद राहणार

नैरोबी : Nzoia शुगर कंपनीने जानेवारी महिन्यात कारखाना देखभालीसाठी बंद ठेवण्यात येईल अशी घोषणा केली आहे. कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक क्रिस्पिन ओगुटू यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांपासून देखभालीविना कारखाना सातत्याने सुरू आहे. त्यामुळे आता गाळपात अडथळे येत आहेत.

ओगुटू यांनी सांगितले की, कारखाना व्यवस्थापनाने जानेवारी महिन्यात कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून इंजिनीअर्सना दुरुस्तीची कामे करण्यास वेळ मिळेल. कारखाना पुन्हा सुरू झाल्यानंतर अडथळे येणार नाहीत. बंगोमायेथील शेतकऱ्यांना साखर उद्योगाच्या गैरव्यवस्थापनाचा फटका बसला आहे. कारखान्याच्या देखभालीचे काम झाले नसल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे असे ओगुटू म्हणाले.

ते म्हणाले, सध्या एक टन साखर उत्पादनासाठी १६ टन उसाचे गाळप करावे लागत आहे. म्हणजेच आम्ही तोट्याचे काम करीत आहोत. त्यामुळे तातडीने देखभाल, दुरुस्तीचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातून शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतील. देखभालीनंतर एक टन साखर उत्पादनासाठी १० टन उसाची गरज असेल असे ओगुटू यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here