विभागात खतौली कारखाना ऊस गाळपात अव्वल

सहारनपूर : गळीत हंगाम जवळपास संपुष्टात आला आहे. विभागात यंदा खतौली साखर कारखान्याने सर्वाधिक ऊस गाळप केले आहे. तर जिल्ह्यात देवबंद साखर कारखान्याने उच्चांकी गाळप केले आहे. यासोबतच मुजफ्फरनगरच्या मोरना साखर कारखाना वगळता इतर सर्व कारखान्यांचे गळीत हंगाम संपुष्टात आला आहे.

लाइव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस विभागाने सांगितले की यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत अधिक ऊस गाळप झाले आहे. मुजफ्फरनगरच्या मोरना साखर कारखाना वगळता विभागातील १६ कारखान्यांचा गळीत हंगाम समाप्त झाला. मुजफ्फरनगरच्या खतौली कारखान्याने सर्वाधिक २४८ लाख क्विंटल उसाचे गाळप केले. तर शामलीच्या थानाभवन कारखान्याने १८४.२८ लाख क्विंटल गाळप केले आहे. तर विभागाने उच्चांकी १८९०.७७ लाख क्विंटल गाळप झाले आहे. याशिवाय, तितावी कारखान्याने १६२, टिकौली कारखान्याने १८५, भैसाना कारखान्याने १२६, मन्सूरपूर कारखान्याने १४७, खाईखेडी कारखान्याने ७७, रोहाना कारखान्याने ३८ आणि मोरना कारखान्याने ४७ लाख क्विंटल उसाचे गाळप केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here