लातूर : किल्लारी शेतकरी सहकारी साखर कारखान्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली. कारखान्याच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी आमदार पवार यांची नियुक्ती झाल्याबद्द्ल कारखाना कार्यस्थळावर पवार यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते म्हणाले, येत्या गाळप हंगामात ४ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून गाळपाचे उद्दिष्ट नक्की गाठू, असेही पवार यांनी यावेळी सांगितले. पवार म्हणाले कि, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी कारखान्याला ५० कोटी रुपये दिले आहेत. कारखाना परिसरात सोलर प्लांटसह इथेनॉल प्रकल्पही उभारला जाणार आहे.
यावेळी माजी जेष्ठ संचालक निवृत्ती भोसले, गुंडप्पा बिराजदार, संतोष मुक्ता, सुभाष जाधव, चंद्रशेखर जाधव, भीमाशंकर राचटे, सुनील उटगे, प्रा. सुधीर पोतदार, कारखान्याचे कार्यकारी संचालक आर.एस. बोरावके, व्यवस्थापन समिती सदस्य प्रवीण फडणीस, गोविंद पवार, प्रवीण कोपरकर, प्रकाश पाटील, काकासाहेब मोरे आदी उपस्थित होते.