कर्नाटक : King Rudra Sugars ची डिस्टिलरी प्लांटचा विस्तार करण्याची योजना

कलबुर्गी : किंग रुद्र शुगर्सने (King Rudra Sugars) कर्नाटकमध्ये कलबुर्गी जिल्ह्यातील होलकुंडा गावातील आपल्या उसाचा रस/ कच्च्या साखरेवर आधारित डिस्टिलरी प्लांटचा विस्तार करण्याची योजना आखली आहे. या विस्तार योजनेनुसार, इथेनॉलची सध्याची उत्पादन क्षमता ५० klpd वरुन १५० klpd पर्यंत वाढविण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. प्रोजेक्ट्स टुडेनुसार, King Rudra Sugars च्या या योजनेला पर्यावरण मंजुरी प्रमाणपत्राची (ईसी) प्रतीक्षा आहे. याशिवाय, ठेकेदार आणि मशीनरी पुरवठादारांच्या निवड करण्यात येणार आहे. मंजुरी मिळताच कंपनी विस्तार योजनेवर काम सुरु करणार असून सप्टेंबर २०२४ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here