थकीत ऊस बिले देण्याची किसान मजदूर उत्थान मोर्चाची मागणी

मवाना: गळीत हंगाम २०२२-२३ मधील ऊस बिले तातडीने देण्याची मागणी किसान मजदूर उत्थान मोर्चाने केली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी मवानाच्या उप जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून थकीत १९० कोटी रुपये लवकरात लवकर दिले जावेत अशी मागणी केली.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, किसान मजदूर उत्थान मोर्चाचे पदाधिकारी राजवीर नागर, कर्मचीर सीना, विश्वंभर चौहान, माह सिंह, संग्राम सिंह, घुपसिंह, काळूराम, चरणसिंह, विनोद कुमार, अनेश कुमार, कटार सिंह यांसह शेतकऱ्यांनी सांगितले की, मवाना साखर कारखान्याने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या ऊसापोटी ५२३ कोटी रुपयांची बिले दिली आहेत. आता कारखाना प्रशासनाकडे १९० कोटी रुपयांची थकबाकी आहे. काही शेतकऱ्यांनी सांगितले की, त्यांनी गहू आणि मक्का बियाणे आणून लागवड केली होती. आता ही पिके कापून शेतकऱ्यांनी घरी नेली आहेत. मात्र, त्यासाठीचे अनुदान त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आलेले नाही. मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला असून शेतीचे नुकसान होत आहे. अशा जनावरांना गोशाळेत पाठवावे अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here