ऊस दर वाढविण्याची किसान सभेची मागणी

रोहटक : अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) राज्य समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. ऊसाच्या राज्य समर्थन मूल्य (एसएपी) वाढ करण्याची मागणी करण्यात आली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना एआयकेएसचे राज्य उपाध्यक्ष इंद्रजित सिंह यांनी सांगितले की, राज्यातील शेतकरी संकटाचा सामना करीत आहेत. ऊस हे दीर्घकालीन पिक आहे. ते खूप काळ शेतामध्ये असते. याशिवाय शेतीचा उत्पादन खर्च वाढला आहे.

ते म्हणाले की, ऊस उत्पादकांना सध्या प्रती क्विंटल ३६२ रुपये एसएपी दिली जात आहे. अलिकडे उत्पादन खर्चात भरपूर वाढ झाली आहे. या तुलनेत एसएपी कमी आहे. खते, किटकनाशके, मजुरी, इंधनाचे दर, कृषी यंत्रांचे भाडे हे खर्च भरमसाठ वाढले आहेत. ऊस तोडणी यंत्राद्वारे केली जात असताना त्यातील उसात सात टक्के कपात केली जाणार आहे. याबाबत चर्चा करण्यात आली. राज्य समितीच्या सर्व सदस्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एसएपी वाढवणे आणि ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात साखर देण्याबाबत तसेच इतर मुद्यांवर चर्चा केली. हे मुद्दे उपस्थित करण्याचे आवाहन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here