कोच्ची: जीआय टॅगिंगने बदललेल मरयूरच्या गूळ निर्मात्यांचे नशिब

167

कोच्ची: आज जगभर बौद्धिक संपदा दिवस साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही केरळमधील भौगोलिक संकेतांक (जीआय मानांकन) याविषयीचे प्रेरणादायी उदाहरण पाहू शकतो. जीआय मिळाल्याने स्थानिक उत्पादक अथवा शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनांच्या विक्रीत फायदा मिळू शकतो. कोचीमधील मरयूर गूळ हे याचे चांगले उदाहरण आहे. जीआय टॅग मिळाल्यानंतर मरयूर गूळाची किंमत ५० रुपये प्रतिकिलोवरून १०५ रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. कारण, खरेदी करणाऱ्या ग्राहकांना चांगल्या श्रेणीतील, गुणवत्तापूर्ण आणि रसायनमुक्त सेंद्रीय गूळ मिळू लागला आहे.

मारिया हिल्स अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट सोसायटीचे सचिव एस. इंद्रजित यांनी सांगितले की जीआय श्रेणी मिळाल्यानंतर फिल्टर ग्रेड १ मरयूर गुळाची किरकोळ विक्री किंमत १०५ रुपये प्रतिकिलो तर घाऊक विक्रेत्यांना ९- रुपये प्रतिकिलो निश्चित करण्यात आली आहे. जीआय टॅग मिळण्यापूर्वी मरयूर गूळ उत्पादक केरळमधील पारंपरिक बाजारात आपल्या उत्पादनाची विक्री करत. तेथे त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. तामिळनाडूमधील स्वस्त गुळासोबत त्यांना स्पर्धा करावी लागत होती. मरयूर गूळ आणि तामिळनाडूमधून येणारा गूळ याच्या दरात १० ते ३० रुपयांचा फरक होता.

मात्र जीआय मानांकन मिळाल्यानंतर हे चित्र बदलले आहे. मरयूर अॅग्रीकल्चर प्रोड्यूसर्स कंपनीचे (मॅपको) सीईओ सेल्विन मारप्पन यांनी सांगितले की, तामिळनाडूमधील गुळाचा दर आता ४५ रुपये आहे. मरयूर आणि कंठललोर येथे सुमारे ९५० शेतकरी पिढ्यानपिढ्या या गावांदरम्यान सुमारे १६५० एकर ऊस शेती आहे. या गावांतील १५० गूळ उत्पादन केंद्रे आहेत. स्थानिक उत्पादनाला जीआय मिळाल्यानंतर चित्र कसे बदलू शकते याचे मरयूर गूळ हे उत्तम उदाहरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here