कोल्हापूर : ऊस दराच्या प्रश्नावरून जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत गोंधळ

कोल्हापूर : ऊस दर प्रश्नाची कोंडी फोडण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जोरदार खडाजंगी झाली. ऊस दर प्रश्नावरून जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा प्रशासन, साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची दुसऱ्या बैठकीत साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिकारी यांच्या जोरदार खडाजंगी झाली.

या बैठकीला पालकमंत्री हसन मुश्रीफ, कॉंगेसचे नेते, आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी, सावकर मादनाईक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य शेतकरी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीला उपस्थित राहण्यास माध्यमांना मज्जाव करण्यात आला होता.

 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या हंगामातील ४०० रुपयांचा फरक आणि यंदाच्या हंगामात साडेतीन हजार रुपये पहिली उचल मिळावी, या मागणीसाठी आंदोलन तीव्र केले आहे. रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेने प्रति टन 5000 दर देणे शक्य असल्याचे म्हटले आहे. तर आंदोलन अंकुशही ऊस दरासाठी आक्रमक झाली आहे. जिल्ह्यात आंदोलनामुळे गाळप अत्यंत संथगतीने सुरु आहे. यात तोडगा काढण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here