कोल्हापूर: चांगल्या मान्सूनमुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणांत १०० टक्के पाणीसाठा

कोल्हापूर : चांगल्या मान्सूनमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील धरणे क्षमतेइतकी भरली आहेत. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांसाठी ही दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यातील १४ धरणांपैकी १० धरणे शंभर टक्के तर उर्वरीत ९५ टक्के भरली आहेत. तुळशी, वारणा, दुधगंगा सारखी प्रमुख धरणे पूर्णपणे भरली असून राधानगरी धरणात ९८ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणक्षेत्रातील अतिरिक्त पावसामुळे धरणे आधीच भरली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जुलै महिन्यात धरणांत चांगला पाणीसाठा झाला. २०२० मध्ये धरणे पूर्ण भरण्यासाठी प्रशासनाला हंगामाच्या अखेरपर्यंत वाट पहावी लागली होती.

कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबरपर्यंत धरणे भरतील अशी शक्यता होती. मात्र, तत्पूर्वीच धरणे भरली आहेत. उर्वरीत धरणेही पुढील आठवड्यात अथवा दहा दिवसांपर्यंत पूर्णपणे भरतील. आता नद्यांमध्येही काही काळ सिंचनासाठी पाणी वापरण्यायोग्य स्थिती आहे. पुढील वर्षी मार्च अखेरपर्यंत जलस्तर टिकून राहावा यासाठीचे नियोजन करण्यात येत आहे. उन्हाळ्यात सिंचनासाठी पाण्याची अधिक मागणी असते. याकाळात पिण्यासाठीही पाण्याची मागणी वाढते. जिल्ह्यात रब्बी पिकांसाठीची तयारी सुरू झाली आहे. ऊसही पक्व झाला असून त्याला तोडणीपर्यंत पाण्याची गरज आहे. सिंचन विभाग यासाठी धरणे आणि नदीकाठावरील बंधाऱ्यातून पाणी उपलब्ध करते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here