कोल्हापूर : दत्त शेतकरी विकास पॅनेलचा गावा-गावात शेतकऱ्यांशी संवाद

कोल्हापूर :श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यात सत्ताधारी गटाने ऊस विकास योजना राबवून एकरी दीडशे ते दोनशे टनाचे उद्दिष्ट घेऊन काम सुरू ठेवले आहे.कारखाना कार्यक्षेत्र आणि इतर जिल्ह्यांत सुमारे ८,५०० एकरांवर क्षारपड मुक्तीचे काम झाले आहे.यापैकी ३,५०० एकरावर प्रत्यक्ष उत्पादनास सुरुवात झाली आहे. यातून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आले, असे प्रतिपादन दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी केले.’श्री दत्त शेतकरी विकास पॅनेल’ने रविवारी नृसिंहवाडीतील श्री दत्त देवस्थानात श्रीफळ वाढवून संवाद दौऱ्यास सुरुवात केली.यावेळी चेअरमन पाटील बोलत होते.

श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पाटील म्हणाले की, सत्ताधारी गटाने कायमच सभासदांच्या हितालाच सर्वोच्च प्राधान्य देऊन आतापर्यंत काम करीत आल्याने सर्व सभासदांचा निश्चितच आम्हाला विश्वास आणि पाठिंबा मिळेल.कारखान्याच्या वतीने विविध ऊस विकास योजना राबविण्यात येत असून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे.यावेळी श्री दत्त साखर कारखान्याचे सर्व विद्यमान संचालक, कर्नाटक व महाराष्ट्रातील सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान, दत्त कारखान्यासाठी २४ जुलै रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे सत्ताधारी गटाकडून संवाद दौरा सुरू करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here