कोल्हापूर : शिरोळच्या दत्त सहकारी साखर कारखान्याची 24 जुलैला निवडणूक

कोल्हापूर :येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 24 जुलै रोजी मतदान होणार आहे.21 जागांसाठी ही निवडणूक होत आहे.महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांत कार्यक्षेत्र असलेला दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना हा मल्टिस्टेट आहे.कारखान्याचे कार्यक्षेत्र सात तालुक्यांचे असून यात शिरोळ, हातकणंगले, करवीर, कागल, निपाणी, चिक्कोडी व कागवाड यांचा समावेश आहे.कारखान्याचे 115 गावांत 28 हजार सभासद आहेत.यंदाच्या निवडणुकीत चेअरमन गणपतराव पाटील यांच्या विरोधात ‘आंदोलन अंकुश’कडून पॅनेल उभे करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अद्याप आपले पत्ते उघडलेले नाहीत.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अमोल येडगे काम पाहणार आहेत.1 जुलै रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर होत असून मतदानासाठी पात्र सभासद व संस्था प्रतिनिधींची कच्ची मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.2 ते 8 जुलैपर्यंत कच्च्या याद्यांवरील हरकती घेण्याची मुदत असून 9 जुलै पक्की मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.10 ते 16 जुलै या कालावधीत नामनिर्देशन पत्र देणे व स्वीकारण्याची मुदत आहे.16 जुलै स्वीकारलेल्या नामनिर्देशन पत्राची यादी प्रसिद्ध करणे.18 जुलै नामनिर्देशन पत्राची छाननी व पात्र नामनिर्देशन पत्राची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल.19 ते 20 जुलै नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत आहे.

आंदोलन अंकुश रिंगणात उतरणार; ‘स्वाभिमानी’ चाही निर्णय लवकरच

चेअरमन गणपतराव पाटील यांच्याविरोधात आंदोलन अंकुश रिंगणात उतरणार आहे. ‘स्वाभिमानी’ ही लवकरच आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याने सत्ताधाऱ्यासमोर कडवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.या निणवडणुकीत आ.राजेंद्र पाटील-यड्रावकर तसेच भाजपची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.या निवडणुकीत को जनरेशन, कारखान्यातील साहित्य चोरी, विस्तारीकरण आदी मुद्दे महत्वाचे ठरणार आहेत.निवडणुकीत आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी आमदार उल्हास पाटील, भाजपचे नेते माधवराव घाटगे, पृथ्वीराज यादव यांच्या भूमिकेकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here