कोल्हापुरातील शेतकऱ्यांची दिल्लीवर धडक

584

27 नोव्हेंबर ला मोर्चा

कोल्हापूर, दि. 5 अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने उसाच्या एफआरपीचा रिकव्हरीचा बेस पुर्वीप्रमाणे 9.50% करा, शेतकर्यांना कर्जमुक्त करा व स्वामिनाथनच्या शिफारशीनुसार शेतीमालाला दीड पट हमीभाव या प्रमुख मागणीसाठी 27 ते 29 नोव्हेंबर 2018 रोजी दिल्लीमध्ये खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली संसदेला घेरोवो मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला दिल्ली येथे जाण्यासाठी स्वाभिमानी एक्सप्रेस स्पेशल ट्रेन चे बुकींग केले जाणार आहे. ज्या शेतकर्यांना या स्पेशल रेल्वेतून यायचे आहे, त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जयसिंगपूर
येथे संपर्क साधावा असे आवाहन शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here