शाहू साखर कारखाना शेतकऱ्यांना करत आहे ऑनलाईन मार्गदर्शन

157

कोल्हापुर : चीनी मंडी

कोरोना मुळे मोठमोठया सभा आता बंद झाल्या आहे, त्यामुळे अनेक कारखान्यात कारखानदार झूम एप सारख्या आधुनिक तंत्राच्या सहाय्याने शेतकऱ्यांशी कनेक्ट होत आहेत. कोल्हापूरात शाहू कारखाना आपल्या शेतकऱ्यांना पुढच्या खरीफ हंगामाचे मार्गदर्शन करण्यासाठी वार्षिक ऊस विकास सेमिनार झूम एपच्या माध्यमातून आयोजित करत आहे.

जिल्हयातील कागल तालुक्यात असणाऱ्या
श्री छत्रपति शाहू सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग उपकरण झूम चा वापर करत आहे. एप्रिल आणि जूनमध्ये देशात ऊस उत्पादनकरणाऱ्या राज्यात साखर कारखाने शेतकऱ्यांना त्यांच्या येणाऱ्या ऊस हंगामासाठी मार्गदर्शन करतात. कोल्हापुर, सांगली, सातारा आणि पुणे येथे शेतकरी 18 महिन्यांच्या ऊसासाठी आपली जमीन कसण्यास सुरु करतात. याशिवाय शेती तज्ञ शेतकऱ्यांना विविध सत्रांच्या माध्यमातून मार्गदर्शन करतात, जेणेकरुन ते रासायनिक उर्वरकांवरची निर्भरता कमी करण्यासाठी जैव उर्वरकाचा उपयोग करून विशेष पिकांच्या उपयोगाने आपली शेती तयार करु शकतील.

शाहू सहकारी कारखान्याचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी सांगितले की, एप्रिल पासून वार्षिक ऊस विकास सेमिनारची तयारी करत होते, जेव्हा कोरोनाचा फैलाव सुरु झाला होता. कारखान्याचे 16,500 शेयरधारक शेतकरी महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या 100 गावात पसरलेले आहेत. साधारणपणे कारखाना 9 उपकेंद्रांमध्ये सेमिनार आयोजित करतो. पण लॉक डाउन मुळे कारखान्याने सेमिनारसाठी अशा पध्दतीचा अवलंब केला. घाटगे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना एका जागी बोलवण्या ऐवजी आम्ही झूम एपचा वापर करण्याचा निर्णय घेतला. कारखान्याचे कर्मचारी अशा शेतकऱ्यांच्या घरी गेले ज्यांच्या घरी लॅपटॉप किंवा एलसीडी टीवी होते. अशा घरांमध्ये त्यांनी 10 ते 15 शेतकऱ्यांना झूम च्या माध्यमातून या बैठकीत सामावून घेण्याचा निर्णय घेतला. आईडी आणि पासवर्ड ची लिंक केवळ त्याच कर्मचाऱ्यांना कनेक्ट करणारी होती, जे योग्य वेळी लॉग इन होतील आणि ज्यामुळे शेतकरी सेमिनार पाहतील. पहिली बैठक 2 जून ला आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये 100 पेक्षा अधिक स्क्रीन च्या माध्यमातून लॉग इन करणारे शेतकरी उपस्थित होते. ते म्हणाले, 15 जून नंतरच्या बैठकीमध्ये अधिक उपस्थिती पहायला मिळेल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here