पश्‍चिम महाराष्ट्रात सेंद्रीय शेतीला पसंती

सेंद्रीय शेतीची एकात्मिक शेतीपद्धत सध्या पश्‍चिम महाराष्ट्रात रुढ होत आहे. ऊस पट्टा म्हणून पश्‍चिम महाराष्ट्राचा भाग ओळखला जातो. या भागात सेंद्रीय शेती मूळ धरु़ लागली आहे. पर्यावरणाची रचना समजून घेवून रसायनांचा वापर टाळून केली जाणारी शेती ही सेंद्रीय पद्धतीत मोडते.

आपल्या देशात हरिक्रांती झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात धान्य मिळू लागले. त्यानंतर भारत हा शेतमाल निर्यात करणार देश झाला. शेतीचे उत्पादन वाढवताना कीटकनाशकांचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला आणि याचे धोके दिसू लागले. त्यानंतर पुन्हा जमिनीचा पोत सुधारण्यासाठी सेंद्रीय शेतीच्या विकासावर भर देण्यात आला आहे. राज्यात 50 शेतकर्‍यांचा एक असे बाराशेपेक्षा अधिक सेंद्रीय शेती गट कार्यरत झाले आहेत.

कृषी विकास योजना राबविण्यासाठी शासनाच्या कृषीविषयक विविध योजनांची पुनर्रचना करुन त्या योजनांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. केंद्र आणि राज्य सरकारने शाश्‍वत सेंद्रीय शेती अभियान सुरु केले आहे. यासाठी प्रयोग करणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहन दिले जाते. या योजनेला राज्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 2016 मध्ये शासन निर्णयानुसार या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यात आले. या उपक्रमासाठी गट केले जातात.
एका गटात 50 शेतकरी साहभागी असतात. राज्यात असे 1258 गट कार्यरत आहेत. कोल्हापूर 37 गटांच्या माध्यमातून सुमारे 1500 हजार एकर जमीन सेंद्रीय पद्धतीने कसली जात आहे.

संद्रीय पद्धतीने शेती करणे हे परंपरागत कृषी व्यवसाय जतन करण्यासारखे आहे. त्यामुळेच आता अन्नाबाबतही लोकांमध्ये जागरुकता आली आहे. त्यामुळे सेंद्रीय पदार्थ विकत घेण्याकडे लोक वळू लागले आहेत. शासनही या योजनेला मदत करत असल्यानेच हा प्रतिसाद समाधानकारक असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी दिली.

शेती अभ्यासक रावसाहेब पुजारी म्हणाले, संद्रीय शेतीची बजारपेठ वाढली तरी याला मर्यादा आहेत. धान्य, भाजीपाला, कडधान्य असा सर्व प्रकारचा सेंद्रीय शेती सातात्याने आणि एकाच छताखाली मिळणे याला मर्यादा आहेत. याला व्यापक बाजारपेठ मिळणे थोडे कठीण आहे.
शिरोळच्या दत्त सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष उद्यान पंडीत गणपतराव पाटील म्हणाले, काही शेतकरी, समूह, संस्था, कारखाने यांनी सरकारच्या कोणत्याही योजनेशिवाय सेंद्रीय शेतीस सुरुवात केली आहे. प्रथम 5 शेतकर्‍यांनी 2.42 हेक्टर क्षेत्रात 411 टन ऊसाचे उत्पादन घेतले. हे पाहून आणखी 500 शेतकरी सेंद्रीय शेतीसाठी पुढे आले आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here