कोल्हापूर : जयसिंगपूर येथे २५ ऑक्टोबरला झालेल्या ऊस परिषदेमध्ये गळीत हंगाम २३-२४ गळीत हंगामातील २०० रूपये अंतिम हप्ता व गळीत हंगाम २०२४-२५ च्या ३ हजार ७०० रूपयाच्या प्रतिटन पहिल्या उचलीची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर ऊस दरासंदर्भात आयोजित केलेल्या नऊ डिसेंबरच्या बैठकीस बहुतांश साखर कारखानदार उपस्थित राहिले नाहीत. त्यांना प्रादेशिक साखर सहसंचालक गोपाळ मावळे यांनी नोटिसा बजावल्या आहेत.
पुढील बैठकीस उपस्थित राहावे; अन्यथा ऊस नियंत्रण आदेश १९६६ चे खंड ९ गाळप आदेश १९८४ चे खंड १३ नुसार कारवाई केली जाईल, असा इशारा नोटीसीद्वारे देण्यात आलाआहे. विधानसभा अधिवेशन संपल्यावर, २३ डिसेंबरनंतरच साखर कारखानदारांची बैठक होईल, अशी शक्यता आहे. प्रादेशिक साखर सहसंचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार नऊ डिसेंबर रोजी साखर कारखाना प्रतिनिधी, संघटना प्रतिनिधी व शेतकऱ्यांची बैठक बोलावली आहे. बैठकीस आजरा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक वगळता अन्य कारखान्यांचे चेअरमन, अधिकारी उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे पुन्हा बैठक होणार आहे. त्या बैठकीस कारखान्यांच्या प्रतिनिधींनी सक्तीने उपस्थित राहावे असा इशारा नोटिशीमधून दिला आहे.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.