कोल्हापूर: पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ

कोल्हापूर : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कसबा बावडा येथील राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची पाणी पातळी १६ फुटांपर्यंत पोहोचली आहे. जर नदीची पाणी पातळी आणखी एका फुटाने वाढली तरी बंधारा जलमय होवू शकतो. त्यामुळे शहर परिसरातील आठ गावांचे दळणवळण यंत्रणा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, कसबा बावडा येथील नागरिकांनी सांगितले की तीन दिवसांपूर्वी राजाराम बंधारा येथे पाणी पातळी १२ फूट होती. ती आता १६ फुटांवर आहे. ऊस तोडणी हंगाम सुरू असल्याने राजाराम बंधाऱ्यावरून ऊस घेऊन जाण्यासाठी बैलगाडीचा वापर केला जातो. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत, शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ८.३ मिमी पावसाची नोंद झाली. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक २२ मिमी पाऊस झाला. त्यापाठोपाठ करवीर तालुक्यात १७.८ मिमी पाऊस पडला आहे. सर्वात कमी पाऊस गडहिंग्लज तालुक्यात २.३ मिमी पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here