32 कोटी व्याज ही द्यावे लागणार: एफआरपी कायदा मोडला
कोल्हापुर; दि. 31 मे 2018 कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कारखान्यांकडून 850 कोटीची एफआरपी थकली आहे. नियमा नुसार चौदा दिवसात एफआरपी दिली नसल्याने त्यावरील सुमारे 30 ते 32 कोटी रूपये शेतकऱ्यांना व्याज द्यावे लागणार आहे.
सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून सुमारे 260 कोटी रुपयांची एफआरपी थकवली आहे. कोल्हापुरातील कारखान्यांना एफआरपी देणे शक्य नसल्याने कारखानदारांनी जिल्हा सहकारी बँकेत बैठक घेऊन एफआरपी दोन टप्यात देण्याचा निर्णय घेतला होता.
उसाची एफआरपी ठरवताना प्रत्येक राज्याचा वेगवेगळा दर ठरवला आहे. पण साखरेचा दर किती असावा हे निश्चित केलेले नाही. त्यामुळे सर्व कारखाने अडचणीत आले आहेत.
कमी दराने साखर विक्रीवर कायद्याने निर्बंध आणण्यासाठी केंद्र सरकारकडे साकडे घातले आहे. साखरेचा किमान विक्री दर प्रतिक्विंटल तीन हजार रुपये असावे अशी अपेक्षा आहे.
कोल्हापुर आणि सांगली जिल्ह्यात यावर्षी (2017-18) हंगामाच्या सुरवातीला साखर प्रतिक्विंटल 3400 ते 3500 रुपये होती. पण हंगामा सुरु होताच हीच साखर प्रति क्विंटल 2400 ते 2450 रुपयांपर्यंत घसरली.
हंगामाच्या सुरुवातीला कारखान्यांनी एफआरपी अधिक प्रतिटन 200 रुपये जादा दिले.
सुरुवातीला शेतकऱ्यांना 3000 ते 2500 रुपयाप्रमाणे बिले मिळाली. आता मात्र ती परिस्थिति राहिलेली नाही. उसाची एफआरपी ठरवताना साखर 3200 ते 3300 रुपयाने होती. आता कमी दर आहे नाही.त्यामुळे जीवनावश्यक वस्तू कायद्याप्रमाणे साखर विक्री प्रतिक्विंटल किमान तीन हजारपेक्षा कमी दराने करू नये, अशी मागणी होत आहे.