कोलकातामध्ये सप्टेंबर महिन्यात १४ वर्षांतील उच्चांकी पाऊस

72

कोलकाता : कोलकातामध्ये सोमवारी गेल्या १४ वर्षातील एकाच दिवशी होणारा सर्वाधिक पाऊस झाला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीय स्थितीमुळे रविवारी रात्रीपासून कोलकाता आणि परिसरात मुसळधार पाऊस झाला. सोमवारी शहराचा बहुतांश भाग जलमय झाला. त्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. काही लांब पल्ल्याच्या गाड्या दुसरीकडे वळविण्यात आल्या. रस्ते वाहतूकीवरही विपरीत परिणाम झाला. दरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर फारसा परिणाम झाला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अनेक जिल्हे जलमग्न झाले आहेत. एक हजार लोकांसह ५७७ मदत केंद्रे उघडण्यात आली आहेत. एकूण १ लाख ४१ हजार जणांची सुटका करण्यात आली आहे. या परिस्थितीशी तोंड देण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपत्कालीन निधी देण्यात आला आहे. नियंत्रण कक्ष २४ तास सुरू ठेवण्यात आला आहे. याशिवाय मदतीसाठी टोल फ्री क्रमांक जारी करण्यात आला आहे.

दरम्यान घरे आणि वीज कोसळून आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. १४ ते १८ सप्टेंबर या कालावधीत घरे पडून सहा जणांचा मृत्यू झाला. तर आठ जण बुडून मृत्यूमुखी पडले. पूर्व आणि पश्चिम मिदनापूरमधील दोन लाख लोक बेघर झाले आहेत. ४७ विभाग आणि आठ नगरपालिका जलमग्न झाल्या आहेत. एकूण १३ लाख लोकांना पुराने वेढले आहे. कोलकातामध्ये गेल्या १४ वर्षात पहिल्यांदाच इतका पाऊस झाला आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here