आंबेडकरनगर : मिझौडा साखर कारखान्यात कोविड १९ लसीकरण उत्सव साजरा करण्यात आला. कटेहरी आरोग्य केंद्राने लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते. ५० अधिकारी, कर्चमाऱ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला.
बलरामपूर साखर कारखान्याच्या अकबरपूर युनीटमध्ये सार्वजनिक आरोग्य केंद्र कटेहरीतर्फे आयोजित या लसीकरण शिबिरात ४५ वर्षावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोविड १९ लसीचा पहिला डोस देण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन कारखान्याचे व्यवस्थापक धनंजय सिंह, फार्मासिस्ट विनय सिंह यांनी केले होते. युनीटचे प्रमुख कृष्ण कुमार वाजपेयी यांनी लोकांना कोविड १९च्या धोक्यांबाबत माहिती दिली. कारखान्याच्या मुख्य व्यवस्थापक रमाशंकर प्रसाद यांनी सर्व अधिकाऱ्यांनी मास्क वापरावेत, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, साबण अथवा सॅनिटायझरचा वापर नियमीत करावा अशा सूचना केल्या अशी माहिती जनसंपर्क अधिकारी नीरज सिंह यांनी दिली.