साखर कामगारांचे 3 महिन्यांचे वेतन थकीत

162

टाकळी ढोकेश्‍वर :लॉकडाऊन मुळे साखर विक्री पूर्ण पने मंदावली आहे तसेच साखर निर्यातही बंद आहे त्या मुळे कारखाने आर्थिक अडचणीत आहेत, जानेवारी, फ्रेब्रुवारी, मार्च या तीन महिन्यांचे तब्बल 300 कामगारांचे वेतन येथील क्रांती शुगर कारखान्याने थकवले आहेत. सध्याच्या लॉकडाउनच्या काळात या कामगारांना वेतन मिळणे आवश्यक आहे. वेतन मिळणेबाबत कामगारांनी निवेदन देवूनही कारखाना व्यवस्थापनाने पगाराबाबतची कसलीही दखल घेतलेली नाही.

क्रांती शुगरचे सरव्यवस्थापक पांडूरंग भगत म्हणालें, कारखान्याची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने पगार थकले आहेत. आम्ही पगार पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करु.

ढोकेश्‍वर येथील देवीभोयरे (ता. पारनेर) या ठिकाणी क्रांती शुगर साखर कारखाना आहे. हा पारनेर साखर कारखाना राज्य बँकेकडून क्रांती शुगर ने विकत घेतला आहे. संतप्त झालेल्या कामगारांनी कारखान्यातील काम बंद पाडले. यामध्ये कामगार नेते शिवाजी सरडे, तात्या देंशमुख यांचा समावेश होता. सर्वच कामगारांनी लवकरात लवकर पगार देण्याची मागणी केली.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here