क्रांतिअग्रणी लाड कारखाना २५ लाख ऊस रोपे विक्री करणार : आमदार अरुणअण्णा लाड

सांगली : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना यंदा २५ लाख ऊस रोपांची विक्री करणार आहे, अशी माहिती आमदार अरुणअण्णा लाड यांनी दिली. साखर कारखान्याच्या नर्सरीमध्ये तयार केलेल्या ऊस रोपे विक्रीच्या प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. कारखान्याने केलेल्या या उपाय योजनेमुळे शेतकऱ्यांचा खर्च वाचणार आहे, असे अध्यक्ष लाड यांनी सांगितले. रोपे विक्री प्रारंभप्रसंगी उपाध्यक्ष दिगंबर पाटील, संचालक सुकुमार पाटील, अनिल पवार, जयप्रकाश साळुंखे, दिलीप थोरबोले, जितेंद्र पाटील, संदीप पवार, कार्यकारी संचालक सी. एस. गव्हाणे, कारखान्याचे कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here