नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून २०२१ मध्ये जारी केलेल्या इथेनॉल मिश्रण रोडमॅपनुसार, Krishak Bharati Cooperative (Kribhco) कडून १,००० कोटी रुपये खर्चून पुढील तीन वर्षात गुजरात, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये ग्रीनफिल्ड धान्यावर आधारित इथेनॉल उत्पादन प्लांट स्थापन करण्यात येणार आहे. या जैव इथेनॉल उत्पादन योजनेसाठी Kribhco कडून Kribhco ग्रीन एनर्जीची स्थापना करण्यात आली आहे.
फायनान्शिअल एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, Kribhco ला हजीरा (सुरत) मध्ये इथेनॉल डिस्टिलरीसाठी (धान्यावर आधारित) पर्यावरण मंजुरी मिळाली आहे. यापैकी गुजरात प्लांटची कोनशीला केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते १४ सप्टेंबर रोजी कृभको येथील सध्याच्या युरिया आणि जैव खतांच्या निर्मिती प्लांट जवळ बसवली जाईल.
हजीरामध्ये स्थापन होणाऱ्या इथेनॉल प्लांटची उत्पादन क्षमता दररोज २५० किलो लिटर (KLPD) असेल. Kribhco चे संचालक परेश पटेल यांनी सांगितले की, Kribhco पुढील दोन वर्षात हजीरा इथेनॉल प्लांटसाठी जवळपास ३५० कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. २०२४ च्या अखेरपर्यंत प्लांट सुरू होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. हजीरा इथेनॉल प्लांट २०० लोकांना रोजगार देईल. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील इतर दोन इथेनॉल युनिट या वर्षीच्या अखेरपर्यंत काम सुरू करतील असा दावा पटेल यांनी केला. त्यांनी सांगितले की, Kribhco दक्षिणेकडील राज्यांमध्ये दोन्ही इथेनॉल प्लांटसाठी आणखी ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.