कोल्हापूर : हंगाम २०२४-२५ करिता सर्व वाहनधारकांनी सक्षम तोडणी यंत्रणा करून कारखाना धोरणाप्रमाणे जास्तीत जास्त ऊस पुरवठा करावा, असे आवाहन येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केले. कारखान्यात नव्या हंगामासाठी ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाडी व ऊसतोडणी यंत्र कराराचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी चेअरमन नरके बोलत होते.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्यातून जास्तीत ऊस गाळप करण्यासाठी हंगाम संपेपर्यंत हातभार लावावा आणि तोडणी, वाहतूक यंत्रणेने कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांचा संपूर्ण ऊस कारखान्याकडे आणावा, असे आवाहन चेअरमन नरके यांनी केले. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक धीरजकुमार माने, मुख्य शेती अधिकारी संजय साळवी, ऊस विकास अधिकारी अॅग्री ओव्हरसिअर्स, शेती विभागाचे सर्व कर्मचारी तसेच वाहतूक प्रतिनिधी दत्तात्र पाटील, भीमराव शेलार, विजय पाटील, अशोक पाटील-कोपार्डे अशोक पाटील, मच्छिंद्र मडके- सचिन पाटील-कळे, निवास जरग रघुनाथ मांगोरे, विलास चव्हाण व इतर वाहनधारक उपस्थित होते.