शाहाबाद साखर कारखान्याचा इथेनॉल प्लांट नव्या वर्षात होणार सुरु

शहाबाद : शाहाबाद सहकारी साखर कारखान्याचे नवनियुक्त मैनेजिंग डायरेक्टर वीरेंद्र चौधऱी यांनी सांगितले की, कारखाना परिसरामध्ये 99 करोड रुपये खर्चकरून बनणारा 60 केएलपीडी उत्पादन क्षमतेचा इथेनॉल प्लांट 21 जानेंवारी 2021 पर्यंत सुरु होणार आहे. यामुळे कारखान्याला आर्थिक लाभ होईल. यानंतर ऊस उत्पादक शेतकर्‍यांना वेळेत ऊसाचे पैसे देणे शक्य होईल. त्यांनी सांगितले की, कारखान्यामध्ये कार्यरत को-जनरेशन प्लांटपासूनही अंदाजे 22-23 करोड रुपयांची विज निर्यात करण्याचे ध्येय आहे. ते फरीदाबाद हून ट्रान्सफर होवून शाहाबाद ला आले आहेत. त्यानीं सांगितले की, कारखान्याचा आगामी ऊस गाळप हंगाम 2020-21, नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्यात सुरु करण्याचा विचार सुरु आहे. त्यांनी सांगितले की, आगामी गाळप हंगामाध्ये 80 लाख क्विंटल ऊस गाळप करुन आठ लाख 80 हजार क्विंटल साखर उत्पादन करेल.

हा कारखाना सर्व 10 सहकारी साखर कारखान्यांमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये नंबर एक वर आहे तसेच कारखान्याला 31 राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आहेत. त्यांनी शेतकर्‍यांना विनंती केली आहे की, आगामी काळात स्वच्छ ऊस घेवून यावे जेणेकरुन साखरेची रिकवरी वाढवली जावू शकेल. त्यांनी सांगितले की, कारखान्याच्या कर्मचार्‍यांच्या कामाबाबत काही समस्या असतील तर त्याही वेळेवर सोडवल्या जातील. 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here