कामगारांचा तुटवडा : शेतकरी वळले केन कटरकडे

104

कलबुर्गी : कामगारांच्या तुटवड्याने कर्नाटक राज्यातील कलबुर्गी जिल्ह्यातील शेतकरी ऊस तोडणी यंत्राचा (केन कटर) वापर करून अधिक आत्मनिर्भर होत आहेत.

दरवर्षी महाराष्ट्रातून कलबुर्गी जिल्ह्यात ऊस तोडणीसाठी कामगार येत होते. मात्र, यावर्षी ऊस तोडणी मजुरांची टंचाई असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तोडणी मशीनवर अवलंबून राहावे लागत आहे. ऊस आधीच तोडणीच्या टप्प्यात आले आहेत. आणि शेतकऱ्यांना कामगारांच्या टंचाईची चिंता सतावत आहे. कारखान्यांना ऊस पुरविण्यास उशीर होऊ नये याची दक्षता शेतकरी घेत आहेत.

कामगारांचा तुटवडा असल्याचे लक्षात येताच अनेक साखर कारखान्यांनी तोडणीचे काम लवकरात लवकर व्हावे आणि लवकर ऊस गाळपासाठी यावा यासाठी केन कटर पाठवले आहेत. या यंत्रांचा वापर करून ऊस तोडणी करताना शेतकऱ्यांचे नुकसान होत नसल्याचे दिसून आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here