ऊस थकबाकी वरुन शेतकरी करणार उपोषण

180

ऊस थकबाकीच्या मागणी वरुन शेतकरी मजूर संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात समिती कार्यालय येथे उपोषण करण्यात येईल. कोरोनामुळे गाळप हंगाम 2019 -20 ची प्रलंबित थकबाकी चा फटका ऊस शेतकऱ्यांना बसत आहे. या बाबत सचिवाणी ऊस समितीला भेटून कोणत्याही परिस्थीतीत ऊसाचे पैसे भागवले जाण्याची मागणी केली.

थकबाकीच्या मुद्यावरून राष्ट्रीय शेतकरी मजूर संघटनेचे जिल्हाध्यक्ष पटेल श्रीकृष्ण वर्मा, जिल्हा उपाध्यक्ष शिवदयाल वर्मा, जिल्हा संगठन मंत्री नरायन लाल वर्मा यांनी ऊस समिती सचिव नंदलाल यांच्याशी चर्चा केली. श्रीकृष्ण वर्मा यांनी सांगितले की, अजूनही असे हजारो शेतकरी आहेत ज्यांचे ऊस गाळप होऊन ७ महिने झाले , तरी आतापर्यंत एकाही पावतीचे पैसे भागवले गेले नाहीत. समिती सचिव नंदलाल यांनी शेतकऱ्यांना एक एक पावतीचे पैसे भागवण्याचा प्रत्येक प्रयत्न केला जाईल असे सांगितले .

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here