क्रशरकडून मोठ्या प्रमाणात ऊस गाळप, गेल्यावर्षीचा उच्चांक मोडला

लखीमपूर खीरी : जिल्ह्यात नऊ साखर कारखान्यांशिवाय २८ क्रशर, खांडसरींकडूनही साखर उत्पादन केले जाते. वर्ष २०२१-२२ मध्ये क्रशरकडून २११,९६ लाख क्विंटल ऊसाचे गाळप करुन १५.३० लाख क्विंटल साखर उत्पादन करण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या साखर उत्पादनाच्या तुलनेत नऊ हजार क्विंटल वाढ झाली आहे. खांडसरी अधिकाऱ्यांनी सांगितले की, यावर्षी क्रशर मालकांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून चांगल्या दराने ऊस खरेदी करण्यात आला. त्यामुळे नकदी पैसे कमाविण्याची इच्छा असलेल्या शेतकऱ्यांनी जोरदार ऊस विक्री केली. साखरेचे कोठार मानल्या जाणाऱ्या खीरी जिल्ह्यात नऊ साखर कारखाने आहेत. मात्र, क्रशरही गेल्या काही वर्षात वाढले आहेत. गेल्या वर्षी २६ क्रशरने ऊसाचे गाळप केले होते. यंदा यामध्ये आणखी २ची भर पडली आहे.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ज्याप्रमाणे भात, गहू विक्रीसाठी सरकारी खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना अडचणी येतात, तशाच प्रकारे ऊस विक्रीवेळीही शेतकरी अडचणीत येतो. अनेक कारखाने काही महिन्यांनंतर शेतकऱ्यांना ऊस बिले अदा करतात. त्यामुळे ज्यांना रोखीने ऊस विक्री करायचे असते, असे शेतकरी क्रशरना प्राधान्य देतात. २०२१-२२ मध्ये २८ क्रशरनी आतापर्यंत ५ अब्ज ४१ कोटी ३० हजार १४० रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिले आहेत. हा एकप्रकारे उच्चांक आहे. गेल्या वर्षी, २०२०-२१ मध्ये क्रशर्सनी २०५.३९ लाख क्विंटल उसाचे गाळप करून १५.२१ लाख क्विंटल साखर उत्पादन केले होते. यावर्षी ३०० रुपये प्रती क्विंटल दर उसासाठी मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here