ऑनलाईन घोषणापत्र भरण्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अखेरची संधी : ऊस आयुक्त

राज्यातील जे शेतकरी ऑनलाईन ऊस घोषणापत्र भरण्यापासून वंचित राहिले आहेत, त्यांना ईआरपीच्या enquiry.caneup. या वेबाईटवर ऑनलाइन घोषणापत्र भरण्याची आणखी एक संधी देण्यात आली आहे. यापूर्वी १५ नोव्हेंबरपर्यंत असलेली मुदत आता ३० नोव्हेंबर करण्यात आली आहे.

याबाबत माहिती देताना ऊस तथा साखर आयुक्त संजय आर. भूसरेड्डी म्हणाले, यापूर्वी ऑनलाईन घोषणापत्र भरण्याची मुदत तीन वेळा वाढविण्यात आली आहे. त्यानंतरही काही शेतकरी यापासून वंचित राहिले. त्यापैकी काहींनी कृषी विभागाच्या १८००-१२१-३२०२ या टोल फ्री क्रमांकावर मुदतवाढीची मागणी केली होती. त्यास अनुसरून ही अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. स्मार्ट गन्ना किसान प्रोजेक्ट अंतर्गत २०२१-२२ या गळीत हंगामासाठी आता अखेरची घोषणापत्रे भरली जात आहेत.

ऊस आयुक्तांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी या अंतिम मुदतवाढीचा लाभ घेत ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन घोषणापत्र भरावे असे आवाहन केले आहे. या घोषणापत्र भरण्याच्या मुदतीनंतर पुन्हा मुदतवाढ देणे शक्य होणार नाही. या मुदतीत घोषणापत्र न भरणाऱ्या शेतकऱ्यांना सामान्य पीक वाढ, उत्पादन वाढ, अतिरिक्त तोडणी, सट्टा आदी सुविधा मिळणार नाही असे ऊस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here