लातूर : अज्ञाताने पेटवला अडीच एकरातील ऊस; ९० हजारांचे नुकसान

लातूर : अज्ञात व्यक्तीने २७ मार्च रोजी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील दैठणा शेत शिवारातील सर्व्हे नंबर ९० मधील अडीच एकर ऊस पेटवून दिला. या घटनेत तुळशीराम लक्ष्मण चंदमपल्ले यांचे सुमारे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी चंदमपल्ले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, उदगीर ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी सांगितले की, तुळशीराम चंदमपल्ले यांची दैठणा शिवारात शेती आहे. यात अडीच एकर ऊस पिक आहे. अज्ञात व्यक्तीने शेतात कोणी नसताना २७ मार्च रोजी ऊस पेटवून दिला. यात नव्वद हजार रुपयांचे नुकसान झाले. अन्य शेतमाल जळून खाक झाला. पोलिसांनी संशयिताविरोधात भादंविस कलम ४३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here