ऊस दरवाढीसाठी भाजप शेतकरी आघाडीचे नेते भेटणार मुख्यमंत्र्यांना

मुजफ्फरनगर : भाजप सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांहे हित जपले जात आहे, असे प्रतिपादन भाजप शेतकरी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष कामेश्वर सिंह यांनी केले. भाजप शेतकरी आघाडीचे शिष्टमंडळ लवकर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन पुढील हंगामात ऊस दर वाढविण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सोंटा गावात भाजप शेतकरी आघाडीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. यावेळी त्यांनी सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी चालवलेल्या योजनांची माहिती दिली. प्रदेश अध्यक्षांनी सांगितले की, ट्रान्सफार्मर ७२ तासांत बदलले जात आहेत. तर शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये किसान सन्मान योजनेचे ६००० रुपये दिले जातात. शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजनांसाठी अनुदानही दिले जात आहे.

यावेळी भाजपचे शेतकरी आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष राम कुमार सहरावत, जिल्हा पंचायत अध्यक्ष वीरपाल निर्वाल, कार्यक्रमाचे संयोजक प्रभात राठी, मंडल अध्यक्ष मनोज राठी, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष देवव्रत त्यागी, रुपेंद्र सैनी, वीरेंद्र सिंह, अमित कसाना, विभागीय अध्यक्ष मोहित बेनीवाल, अमित जैन, अजय बराला, सतेंद्र तुगाना, संजय त्यागी, तेजा गुर्जर आदींची भाषणे झाली.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here