मुंडेरवा कारखान्याच्या बॉयलर ट्यूबमध्ये लिकेज, गाळप बंद

बस्ती : मुंडेरवा साखर कारखान्याच्या बॉयलर पाईपमध्ये गळती सुरू झाल्याने ऊस गाळप बंद पडले आहे. कारखाना बंद पडल्याने थंडीत ऊस घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मुंडेरवा साखर कारखान्याच्या बॉयलरची ट्यूब मंगळवारी गाळप करताना खराब झाली. त्यामुळे कारखान्याचे गाळप थांबवावे लागले आहे.

कारखाना बंद झाल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. लांबून ऊस घेऊन आलेले शेतकरी रुदल यादव, रामकरन, कन्हैया लाल, लालसा, सुग्रीव, हनुमंत, विश्वंभर पांडे यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांच्या बेफिकीरीमुळे दरवर्षी अशा अडचणी येतात. गेल्यावर्षीही ट्यूब लिकेजमुळे कारखाना अनेक दिवस बंद राहीला होता. गेल्या १२ तासांपासून कारखाना बंद आहे. याबाबत कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक ब्रजेंद्र द्विवेदी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, बॉयलरच्या ट्युबमध्ये गळती झाल्याने कामकाज थांबवावे लागले. याची दुरुस्ती इंजिनियर्सची टीम करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here