पंढरपूर येथे ऊसतोड कामगारांसाठी कायदेविषयक शिबिर

सोलापूर : पंढरपूर येथे ऊसतोड कामगारांना त्यांच्या हक्काची जाणीव होण्यासाठी व त्यांची फसवणूक, पिळवणूक होऊ नये, यासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण (मुंबई) यांच्या निर्देशानुसार ऊसतोड कामगार वस्तीमध्ये दिवाणी न्यायाधीश एम. आर. कामत यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

ऊसतोड मुकादम यांनी जर पिळवणूक केली, तर त्यासाठी कायद्याची मदत घ्यावी. ऊसतोड कामगार हे असंघटित कामगार असल्याने त्यांना शासनाच्या विविध योजना लागू होतात. त्यांनी त्या योजनांचा लाभ घेतला पाहिजे, असे न्यायाधीश कामत यांनी ऊसतोड कामगारांना सांगितले. शिबिरास पंढरपूर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड. अर्जुन पाटील यांनी प्रस्तावना केली. कामगारांना हक्कांची माहिती सचिव ॲड. राहुल बोडके यांनी दिली. कार्यक्रमाचे आभार शशिकांत घाडगे यांनी मानले.कार्यक्रमास ऊसतोड वस्तीवरील कामगारांसह महिलांचा मोठा सहभाग होता. त्याचबरोबर न्यायालयीन कर्मचारी के. के. शेख, व्ही. डी. ढोबळे, डी. एम. भोसले व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here