इजिप्तमध्ये साखर उत्पादन २.८ मिलियन टन होण्याचे अनुमान

काहिरा : इजिप्तकडे सहा महिन्यांहून अधिक काळासाठी पुरेसा साखरेचा साठा आहे. Sugar Crops Council चे प्रमुख मुस्तफा अब्देल गवाद यांनी सांगितले की, २०२२ मध्ये साखरेचे अपेक्षित उत्पादन २.८ मिलियन टन असेल. हे उत्पादन २०२१ मधील ३ मिलियन टनापेक्षा कमीच राहील.

इजिप्तने २०२३ पर्यंत साखर उत्पादनात स्वयंपूर्णता आणण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. इजिप्तची २०१७ मध्ये ५७ टक्के असलेली साखर उत्पादन क्षमता वाढून २०२२ मध्ये ९० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. देशात ऊस पिकाचा तुटवडा असल्याने बीटचा अधिकाधिक वापर साखर उत्पादनासाठी केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here