शेतकर्‍यांच्या सर्व समस्यांचे लवकरच निराकरण करु: गोव्याच्या उपमुख्यमंत्र्यांचे अश्‍वासन

संगुएम गोवा : गोव्याचे उप मुख्यमंत्री चंद्रकांत कावलेकर यांनी ऊस शेतकर्‍यांच्या प्रतिनिधींना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केल्यानंतर लवकरात लवकर त्यांच्या समस्या सोडवू असे अश्‍वासन दिले. कावलेकर यांनी शेतकर्‍यांच्या प्रतिनिधीमंडळाला ऊस शेतकर्‍यांच्या हितार्थ ठोस मार्ग काढण्याचे आश्‍वासन दिले. कावलेकर यांनी सांगितले की, जेव्हापासून संजीवनी साखर कारखान्याचा मुद्दा शेतकर्‍यांच्या अडचणींचे कारण बनला आहे, तेव्हापासून शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा मी हरएक प्रकारे प्रयत्न केला आहे, आणि पुढेही तो कायम ठेवीन.

कावलेकर यांनी दावा केला की, जेव्हा शेतकर्‍यांनी ऊस थकबाकी भागवण्यात होणार्‍या विलंबाचा प्रश्‍न उपस्थित केला, तेव्हा मी वैयक्तीकपणे मुख्यमंत्र्यांना भेटलो त्यांच्याशी चर्चा केली आणि गणेश चतुर्थी पूर्वी शेतकर्‍यांना पैसे मिळवून दिले. त्यांनी सागितले की, उर्वरीत पैसे अजूनही देय आहेत, तेदेखील लवकरात लवकर दिले जातील. कावलेकर यांनी त्या 89 शेतकर्‍यांनाही योग्य मोबदला देण्याचे आश्‍वासन दिले आहे. ज्यांचा ऊस तुटु शकलेला नव्हता, कारण खानापूर च्या लैला साखर कारखान्याने आपला गाळप हंगाम बंद केला होता. उपमुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शेतकर्‍यांच्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करणार्‍या फ्रांसिस्को मैस्करेनहास यांनी सांगितले की, ते सरकारकडून सकारात्मक उत्तराच्या प्रतिक्षेत आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here