शेती मालास हमीभाव मिळाला तरच शेतकरी जगू शकेल: पाशा पटेल

सगरोळी, (जि. नांदेड): शेतकर्‍यांनी पिकविलेल्या शेतमालास योग्य भाव मिळावा, यासाठी प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले. सगरोळी (ता. बिलोली) येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजित ’कृषीवेद 2020’ या कृषी तंत्रज्ञान महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. संस्कृती संवर्धन मंडळाचे विश्‍वस्त भालचंद्र देगलूरकर, अध्यक्ष प्रमोद देशमुख, ’नाबार्ड’चे जिल्हा विकास अधिकारी राजेश धुर्वे, व्ही. एन. आरचे वरिष्ठ विक्री अधिकारी अनुप नागर, कोल्हापूर येथील प्रगतशील शेतकरी विनोद पाटील, उद्धवराव खेडेकर, अनिल पाटील, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक गणेश पाटील, राष्ट्रीय बांबू अभियानाचे मराठवाडा समन्वयक भालेकर, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सुरेश कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.

पटेल म्हणाले, निसर्गाच्या लहरीपणामुळे कुठल्याही पिकाचे खात्रीलायक उत्पन्न मिळणे कठीण झाले आहे. शेती मालास हमीभाव मिळाला तरच शेतकरी जगू शकेल, शेतमालास योग्य भाव मिळावा यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत. पंतप्रधानांनी दखल घेतल्यामुळे शेतकर्‍यांच्या शेतमालास योग्य भाव मिळत आहेत. येत्या काळात सोयाबीन, हरभ-याच्या दरात सुधारणा अपेक्षित आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

SOURCEChinimandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here