टोकाई साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या ठरावाचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल

हिंगोली : टोकाई सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी मे महिन्यात संचालक मंडळाने ठराव घेतल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. दरम्यान, बैठकीत ठराव झाला नसल्याचे कारखान्याचे अध्यक्ष सांगत आहेत. सद्यस्थितीत कारखाना आर्थिक संकटात सापडला आहे. कारखान्याची मशिनरी विक्रीच्या निविदाही काढण्यात आल्या आहेत. हा कारखाना टिकावा यासाठी पूर्णा सहकारी साखर कारखान्याने ‘टोकाई’ भाडेतत्त्वावर घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या.

पूर्णा कारखान्याने हा कारखाना घेण्याऐवजी परभणी जिल्ह्यातील तुळजाभवानी शुगर प्रा. लि., आडगाव (दराडे) यांना तो भाडेतत्त्वावर देण्याची तयारी अध्यक्षांनी केली. त्या कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या थकीत रक्कम देण्यासाठी ४ कोटी २५ लाख रुपयेदेखील घेण्यात आले. संचालकांनी २४ मे रोजी बैठक घेत तुळजाभवानी ‘शुगर’ला कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी ठरावदेखील केला आला. ठरावाचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होताच टोकाईचे अध्यक्ष शिवाजी जाधव हे किती सत्य बोलत आहेत का असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर आता २१ जून रोजी सभा होणार आहे. दरम्यान, कारखान्याचे कार्यकारी संचालक अनिल लाभसेटवार यांनी सांगितले की, टोकाई भाडेतत्त्वावर देण्यासाठी कोणताही ठराव घेण्यात आला नाही. त्याबद्दल माहितीदेखील नाही. २१ जून रोजी अधिमंडळाच्या विशेष सर्वसाधारण सभेत निर्णय होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here