ऊस शेतकरी संघटनांचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना पत्र, आंदोलनाचा इशारा

लखनऊ: शेतकऱ्यांच्या एका संघटनेने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना रविवारी पत्र लिहून २०१७ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऊस उत्पादकांना दिलेल्या जाहीर आश्वासनाबाबत विचारणा केली आहे. आश्वासन पूर्ण झाले नसल्याने पुढील महिन्यापासून आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे.

राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे संयोजक व्ही. एम.सिंह यांनी मुख्यमंत्री योगी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चौदा दिवसांत ऊसाचे पैसे मिळाले नाहीत तर त्यावर व्याज देण्याची घोषणा केली होती. मात्र, साडेचार वर्षे उलटूनही हे आश्वासन पूर्ण करण्यात आले नसल्याचे म्हटले आहे.

या पत्रामध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी यांनी जर आमचे सरकार सत्तेवर आले तर आम्ही चौदा दिवसांत ऊस उत्पादकांना पैसे देण्याची व्यवस्था करू. जर ऊसाची थकबाकी राहीली तर त्यावर व्याज दिले जाईल असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. या आश्वासनावर विश्वास ठेऊन शेतकऱ्यांनी भाजपचे सरकार सत्तेवर आणले. मात्र, चौदा दिवसांत ऊसाचे पैसे आणि नंतर त्यावरील व्याजही मिळालेले नाही. ऊस उत्पादक गेली साडेचार वर्षे पंतप्रधानांच्या आश्वासनाची अंमलबजावणी होण्याची वाट पाहत आहेत.

याप्रश्नी शेतकरी सहा जुलै ते १२ जुलै या कालावधीत सर्व जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालये, उप जिल्हाधिकारी कार्यालये, तहसील ऑफिस आणि ऊस समित्यांच्या परिसरात आंदोलन करतील. १५ जुलैनंतर लखनौच्या ऊस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल. गळीत हंगाम २०२०-२१ या काळातील ऊस बिले त्वरीत द्यावीत, २०१५-१६ ते २०२०-२१ या काळातील थकीत ऊस बिलांवर पंधरा टक्के व्याज द्यावे.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here