ऊस दर ४५० रुपये प्रती क्विंटल करण्यासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना पत्र

मेरठ : ऊसाच्या दरात वाढ करण्याच्या मागणीबाबत सच या संस्थेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांना पत्र पाठवले आहे.

संस्थेचे अध्यक्ष संदीप पहल यांनी सांगितले की, २०१७-१८ मध्ये सरकारने उसाच्या दरात फक्त १० रुपयांची वाढ केली. त्यानंतर गेल्या चार वर्षात दरवाढ झालेली नाही. याऊलट या काळात डिझेलचे दर ५० टक्क्यांनी, मजुरी २५ टक्के आणि विजेचा वार्षिक खर्च ६,००० रुपयांनी वाढला आहे. किटकनाशकांची दरवाढ झालेली नाही. मात्र, उसाचे वजन घटत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दुसरीकडे साखरेच्या रिकव्हरीतही सव्वा टक्के वाढ झाली आहे. आकडेवारी मांडताना अध्यक्ष पहल म्हणाले की शेतकऱ्यांचे सुमारे ४० टक्क्यांपर्यंत नुकसान होत आहे. सरकारने तातडीने स्वामीनाथन समितीच्या शिफारसी लागू करण्यासह उसाचा दर प्रती क्विंटल ४५० रुपये करण्याची गरज आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here