साखर कारखाना भागवणार आठ दिवसांचे देय

112

रुडकी: लिब्बरहेडी साखर कारखाना या आठवड्यात भागवणार आठ दिवसांचे देय. यासाठी सात करोड रुपयांचा निधी समितीच्या खात्यामध्ये जमा केला आहे. तीन करोडचा निधी देखील लवकरच खात्यात जमा होईल. तर इकबालपूर साखर कारखान्याकडून आतापर्यंतची थकबाकी भागवण्याचे केवळ आश्‍वासन देण्यात आले आहे.

प्रलंबीत ऊस थकबाकीबाबत शेतकर्‍यांच्यात नाराजी वाढत आहे. साखर कारखान्याकडून थकबाकी भागवण्याची गती अगदीच मंद आहे. यामुळे ऊस आयुक्त ललित मोहन रयाल यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, लिब्बरहेडी साखर कारखान्याने शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे. लिब्बरहेडी साखर कारखान्याचे महाव्यवस्थापक अनिल कुमार यांनी सांगितले की, कारखान्याने पूर्वी 29 फेब्रुवारी पर्यंतची थकबाकी भागवली आहे. आठ मार्च पर्यंतचे पैसे भागवण्यासाठी सात करोडचा निधी खात्यात ट्रान्सफर केला आहे. उर्वरीत तीन करोडही लवकरच जमा होतील. ते म्हणाले, पुढच्या आठवड्यात कारखान्याकडून उरलेले पैसे दिले जातील. तर इकबालपूर साखर कारखान्याने ऊस थकबाकी भागवण्यातबाबत कोणतीही हमी दिलेली नाही. कारखाना व्यवस्थापनाकडून केवळ आश्‍वासन दिले जात आहे. याबाबत शेतकरी क्लब चे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी कटार सिंह यांनी आरोप केला की, ऊस विभाग साखर कारखान्यावर दबाव बनवण्यात अपयशी ठरत आहे. ज्यामुळे साखर कारखाने थकबाकी भागवत नाही आहेत. सहाय्यक ऊस आयुक्त शैलेन्द्र सिंह यांनी सांगितले की, या संदर्भात साखर कारखान्यावर दबाव बनवला जात आहे. आशा आहे की, पुढच्या आठवड्यात 29 फेंब्रुवारीपर्यंतची थकबाकी भागवली जाईल. साखर कारखान्याने आतापर्यंत 22 फेब्रुवारीपर्यंतचे पैसे दिले आहेत.

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here