सव्वा करोडसाठी कारखान्याने थांबवली 50 करोडची शेतकर्‍यांची देणी

रुडकी : ऊस थकबाकीच्या मुद्दयाकडे कारखान्यांचे मोठे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप, शेतकर्‍यांनी केला आहे. लिब्बरहेरी साखर कारखान्याने सव्वा करोड साठी 50 करोडची शेतकर्‍यांची देणी थांबवली आहेत. कारखान्याने 10 ऑक्टोबरपर्यंत 50 करोड रुपयांची देणी भागवणे क्रमप्राप्त होते, पण ऊस विभागाकडून मिळणारे सव्वा करोड रुपये अजूनपर्यंत मिळाले नाहीत, असे सांगून कारखान्यांनी थकबाकी तशीच ठेवली. यामुळे शेतकर्‍यांचे ऊसाचे पैसे अडकले आहेत. सततच्या विनंत्या, अर्ज आणि आंदोलने करुनही देशातील अनेक कारखान्यांनी ऊस थकबाकी भागवलेली नाही.

काही दिवसापूर्वी ऊस शेतकर्‍यांनी थकबाकीसाठी आंदोलन केले होते. यावर कारखाना प्रबंधकांनी अश्‍वासन दिले होते की, ऊस थकबाकी भागवली जाईल. लिब्बरहेडी कारखान्याने शेतकर्‍यांना सांगितले की, 30 सप्ेटंबर पर्यंत 50 करोडपर्यंत देणी दिली जातील. यानंतर  4 ऑक्टोबर पर्यंत 25 करोड देण्याचे वचन दिले गेले. 4 ऑक्टोबरचा दिवस गेल्यानंतर 10 ऑक्टोबरची तारीख दिली गेली. पण आता तीदेखील उलटली आहे, शिवाय बँकाही दोन दिवस बंद आहेत. आता सोमवारीच बँक उघडणार. यामुळेच शेतकर्‍यांना त्यांचे पैसे मिळण्याची आशा नाही.  लिब्बरहेरी साखर कारखान्याने सांगितल्याप्रमाणे ऊस विभागाकडून सव्वा करोड येणे आहे. दहा दिवसांपासून हे येणे अडकून आहे. जर हे पैसे मिळाले तर शेतकर्‍यांची देणी भागवली गेली असती.

शेतकर्‍यांचे नेते गुलशन रोड म्हणाले, साखर कारखाना आणि ऊस विभाग यांचा खेळ सुरु आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांचेच नुकसान होत आहे.  यासंदर्भात सहाय्यक ऊस आयुक्त शैलेन्द्र सिंह यांनी सांगितले की, सव्वा करोडचा आरटीजीएस केला होता. पण सर्व्हर डाउन असल्यामुळे हे देय भागवलेे गेले नाही आहे. यासंदर्भात बँक प्रबंधकांना पत्र लिहिण्यात आले आहे. शिवाय कारखाना प्रबंधकांना लवकरात लवकर शेतकर्‍यांची देणी भागवण्याबाबत सांगण्यात आले आहे.  केंद्र अणि राज्य सरकारने अनेक प्रयत्न करुनही उत्तर प्रदेशात अजूनही 4,700 करोड रुपयाहून अधिक ऊस थकबाकी देय आहे. उत्तर प्रदेश सरकार ऊसाचे पैसे भागवण्यात अपयशी ठरलेल्या कारखान्यांविरोधात कारवाई करत आहे, पण देणी खूपच मंद गतीने भागवणे सुरु आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here