द्रवरूप साखर : एक नवीन पर्याय

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

साखरेचे वेगवेगळे प्रकार आहेत. द्रवरूप साखरे मध्ये मुख्यत्वे दोन प्रकार येतात त्यापैकीच एक म्हणजे द्रवरूप साखर आणि दुसरी इन्व्हर्ट साखर जिच्यामधील ग्लुकोज आणि फ्रुक्टोस वेगळे केलेले असतात आणि हि इन्व्हर्ट साखर नेहमीच्या साखरेपेक्षा थोडी गोड असते.

जी आपण कोणत्याही गरम किंवा थंड पेय किंवा आपल्या आवडत्या पाककृतींमध्ये गोडवा आणणेसाठी वापरली जाऊ शकते तसेच चहा, मिश्रित पेय, कॉफी, सॅलड, ड्रेसिंग्स, सूप्स, स्पॅगेटी सॉस, कुकीज, ब्राउनीज, पाईज, केक्स आणि आईसक्रीम मध्ये सुद्धा वापरली जाते, आपण स्ट्रॉबेरी, फ्रेंच टोस्ट, पॉपकॉर्न किंवा अन्नधान्यावर सुध्दा याचा वापर करू शकतो,. जी शीतपेय मध्ये लगेच विरघळते, हे आधीच द्रव असल्यामुळे ते कितीही थंड असले तरीही ते कोणत्याही ड्रिंकमध्ये त्वरित वितळते. तसेच गरम पेये मध्ये चव वाढवण्याकरिता सुद्धा वापरले जाते.

जेवणामध्ये सुद्धा द्रवरूप साखर वापरली जाते. दाणेदार साखर पदार्था मध्ये विरघळायला जेवढा वेळ घेते त्यापेक्षा कमी वेळ द्रवरूप साखर घेते त्यामुळे वेळ आणि इंधनाची बचत होते. फक्त द्रवरूप साखरेचा साठवणूक काळ कमी असून थंड वातावरणात त्याला दाणेदार पणा येतो त्याला थोडा उष्मा दिला तर द्रवरूप साखर मूळ रूपात येते.

आजकालच्या धावत्या जीवनशैली मध्ये द्रवरूप साखर लगेच तयार होणाऱ्या गोड पदार्थांसाठी चांगला पर्याय असू शकते. आपल्या देशात अजून या द्रवरूप साखरेचा वापर जास्ती प्रमाणात नाही होत पण भविष्यात साखर उद्योगाला एक चांगला पर्याय मिळू शकतो आणि उद्योगाला चालना मिळू शकते.

भारतीय उपखंड द्रवरूप ऊस उत्पादनात अग्रेसर आहे आणि तिथं द्रव साखरेला चांगले भविष्य असू शकते. तसेच या देशांच्या आर्थिक स्थितीतील एकूण सुधारणांच्या पार्श्वभूमीवर आशिया-पॅसिफिकच्या मधील उदयोन्मुख देशांमध्ये अन्न उद्योगांचे वेगवान वाढ होत आहे. यासाठी सरकारने यासाठी सक्षम आणि नियोजनपूर्वक धोरणे आखल्यास द्रवरूप साखरेस चांगली बाजारपेठ मिळणेस मदत होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here