थकबाकी भागवली नसल्यामुळे साखर गोदामाला लावले टाळे

रोहटा : किनौनी येथील बजाज साखर कारखान्याकडून गेल्या हंगामातील 38 करोड रुपये देय आहेत. याबाबत ऊस विभागाने कारखाना व्यवस्थापनाकडे तक्रारी करणे सुरु केले आहे. शुक्रवारी कारखान्यात आलेल्या सहकारी ऊस समितीच्या टीमने साखर गोदामाला टाळे लावले. तर कारखाना व्यवस्थापनाने जानेवारी महिन्यात पूर्ण पैसे देणार असल्याचे सांगितले आहे, परंतु टीमने साखरेच्या गोदामाला ताब्यात घेत टाळेबंदी केली.

ऊस विभागाच्या आदेशावरुन शुक्रवारी दुपारी सहकारी ऊस विकास समिती मलियाना चे सचिव श्रीपाल यादव आपल्या टीमसह बजाज साखर कारखाना किनौनी येथे आले. कारखान्याच्या सेल्स ऑफिसमध्ये जावून त्यांनी साखरेच्या नोंद साठ्याची तपासणी केली आणि कारखान्याच्या साखरेच्या गोदामाचेही निरीक्षण केले. किनौनी साखर कारखान्याकडून गेल्या हंगामाचे 38 करोड रुपये देय आहेत. शेतकर्‍यांना थकबाकी मिळण्यासाठी किनौनी साखर कारखान्याच्या गोदामाला टाळे घातले. तसेच कारखाना व्यवस्थापनाला इशारा दिला की, जोपर्यंत गेल्या हंगामातील देय भागवले जात नाही, तोपर्यंत ऊस विभागाकडून कडक कारवाई केली जाईल. कारखाना व्यवस्थापनाने गेल्या हंगामातील थकबाकी जानेवारी महिन्याच्या शेटवच्या आठवड्यापर्यंत पूर्ण करण्याचा विश्‍वास समितीला दिल, पण टीम ने कारखाना व्यवस्थापनाचे काहीही न ऐकता टाळेबंदी केली.

बजाज साखर कारखान्याचे यूनिट हेड केपी सिंह म्हणाले की, साखरेच्या विक्रीवर ऊस विभागाच्या खात्यावर पैसे जमा करुन शेतकर्‍यांची थकबाकी भागवली जात आहे. कारखान्याकडून आता कोणताही हलगर्जीपणा केला जाणार नाही.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here