आजपासून २१ दिवस संपूर्ण देशात लॉक डाऊन

177

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर एकाच आठवड्यात सलग दुसऱ्यांदा देशाला संबोधित करताना मोठी घोषणा केली. आता भारत देश आज मध्य रात्रीपासून २१ दिवसांसाठी “लॉक डाऊन करण्यात येणार आहे. अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्रमोदी यांनी केली आहे.

यावेळी मोदी म्हणाले, ‘जनता कर्फ्यूने दाखवून दिले की, देशावर ज्यावेळी कोणतेही संकट येते तेव्हा संपूर्ण देश एकजुट होतो, परंतु कोरोनासारख्या महारोगाने जगातील सामर्थ्यशाली राष्ट्रांनाही हतबल करून ठेवले आहे. त्या राष्ट्रांकडे साधन नाहीत, असे नाही. पण, हा आजार इतक्या वेगाने पसरत आहे की, तयारीच करता येत नाही. त्यामुळे आज रात्रीपासून संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये जात आहे,’ अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली.

आज संपूर्ण देशात कोरोना आजाराचा उद्रेक झाला आहे. देशातील अनेक राज्य लॉकडाउनमध्ये गेली आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांशी संवाद करणार असल्याचे ट्विट करून सांगितले होते. त्यामुळे पंतप्रधान मोदी कोरोनाला आळा घालण्यासाठी कोणती मोठी घोषणा करणार यावरून चर्चा सुरू होती. अखेर पंतप्रधानांनी केलेल्या घोषनेनुसार भारत देश आता २१ दिवसांसाठी “लॉक डाऊन” करण्यात येणार आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here